१५ ऑगस्ट निमित्त जिलेबी व अल्पोपहारचे वाटप

संग्रामनगर दि.१६ (प्रतिनिधी):
अकलुज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुप्रसिद्ध डाळींब मार्केटमधील व्यापारी राजूभाई बागवान यांच्याकडून १५ ऑगस्ट निमित्त जिलेबी व अल्पोपहार वाटप करण्यात आले.
अकलूज येथील सुप्रसिद्ध डाळिंब व्यापारी व मोहम्मद साद आणि कंपनीचे मालक राजू भाई बागवान यांचेकडून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उपस्थित असलेल्या व्यापारी वर्ग,शेतकरी वर्ग व कामगार अशा जवळपास ४०० लोकांना जिलेबी व नाष्टाचे वाटप करण्यात आले. त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्याच्या या कार्यामुळे समाजात सर्व धर्म समभाव ही भावना जागृत होऊन सलोख्याचे वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे.यावेळी सामुदायिक राष्ट्रगीत होऊन भारत मातेच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या व फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दादाभाई तांबोळी,पिंपरी येथील शिवाजी क्षीरसागर (पुढारी) डाळिंब व्यापारी नानासाहेब जाधव,अक्षय सोनवणे,इम्रानभाई बागवान, विठ्ठल घाडगे,भोसले,कोकरे,बादशाह, जय अंबे,जगदंब,मंगलमूर्ती इत्यादी फर्मचे मालक,व्यापारी, असंख्य शेतकरी व कामगार उपस्थित होते
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,सचिव राजेंद्र काकडे व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य,मार्गदर्शन लाभले या अनोख्या व प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज