दिलीप वायदंडे यांना काव्यमित्रचा राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

प्रतिनिधी :-कोर्टी येथील व सध्या चिकलठाण येथे कार्यरत श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयाचे प्राचार्य मा. दिलीप हरिबा वायदंडे यांना त्यांच्या तीस वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल काव्यमित्र सामाजिक संस्थेच्या राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराचे वितरण 3 सप्टेंबर रोजी पुणे येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जे.डी.अवघडे, अर्चना निकम यांच्या हस्ते माननीय दिलीप वायदंडे यांचा सपत्नीक सन्मान ज्येष्ठ कृषीतज्ञ मा. रश्मीकुमार अब्रोल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
दिलीप हरिभाऊ वायदंडे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरामध्ये कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना, आई साळूबाई व वडील हरिभाऊ त्यांनी अत्यंत नेटाने दिलीप यांना शिक्षण दिले. त्यांनी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत प्रथम शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्यभार स्वीकारला. त्यानंतरही त्यांच्या शैक्षणिक कामाचा आलेख उंचावत राहिला आणि तीन वर्षांपूर्वी त्यांनी केळघर येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयामध्ये मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला. अत्यंत कडक शिस्तीचे, प्रेमळ मनमिळाऊ व पारदर्शकपणे प्राचार्य म्हणून त्यांची ख्याती आहे.

त्यांच्या याच नावलौकिकामुळे काव्य मित्र सामाजिक संस्थेकडून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे काव्यमित्र सामाजिक संस्थेचे सचिव प्रा.राहुलकुमार चव्हाण यांनी सांगितले.
याप्रसंगी काव्यमित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्र सगर, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक सुशीलदादा बियाणी, यांच्या हस्ते श्री सूर्यकांत शेठकार यांच्या आरसा समाज मनाचा पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
दिलीप वायदंडे सरांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे वरती पंचक्रोशीतील तसेच चिकलठाण परिसर व केळघर विद्यालय सातारा परिसरातून त्यांच्यावर अभिनंदना चा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज