अ.भा. मराठी साहित्य संमेलनात एसटी चालक महादेव ढोणे सन्मानित

प्रतिनिधी : प.पूज्य सानेगुरुजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्मभूमीत अर्थात अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एसटी महामंडळाच्या नांदेड विभागात चालक म्हणून कार्यरत असलेले कवी श्री.महादेव ढोणे यांना सन्मानित करण्यात आले आहे. अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. विशेष बाब म्हणजे कवी महादेव ढोणे यांच्या कवितेची निवड सलग दुसऱ्यांदा होऊन कवीकट्ट्यावर अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली.

            या संमेलनात हदगाव आगारातील कवी श्री. महादेव ढोणे हे दि.३ फेब्रुवारी रोजी कवी गणेश कुडे कवीकट्टा या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांची आयोजकांनी निवड केलेली “ती म्हणाली…चुकलंच माझं” हे शीर्षक असलेली एक वेगळा आशय आणि विषय असलेली प्रेम कविता सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. “कवी कट्टा” या मंचावर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सुंदर असे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यांचा पूर्वी कार्यरत असलेले राजुरा आगार तसेच सध्याच्या हदगाव आगारातील सहकारी अधिकारी, कर्मचारी बांधवांच्या वतीने व एसटी साहित्य रसिक समूहाच्या वतीने व तसेच गावाकडील मित्रमंडळी, नातेवाईक यांनी सुद्धा श्री महादेव ढोणे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज