अकलूज बाजार समिती मध्ये फळ मार्केट सुरू ; पेरू, सीताफळ, आंबा, बोर ला व्यापारी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

अकलूज : घोडे बाजार व डाळिंब मार्केट मुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फळ मार्केट ला सुरुवात झाली असून पेरू, सीताफळ, आंबा, बोर ला शेतकरी व व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

          माळशिरस तालुक्यातील शेतकरी व फळ विक्रेत्यांच्या बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितिच्या भव्य शेड मध्ये फळ मार्केटला आज सुरुवात केली. आज पहील्याच दिवशी पेरू ला 86 ते 110 रुपये भाव मिळाला आहे.

            फळ मार्केट मध्ये माळशिरस तालुक्याबरोबरच माढा, इंदापूर, तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळे विक्रीस आणली होती तर अकलूज, कलकत्ता, उत्तर प्रदेश, बिहार, सांगोला, पंढरपूर, इंदापूर येथील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेतला. यावेळी सभापती मदनसिंह मोहिते पाटील, संचालक नितीन सावंत, सचिव राजेंद्र काकडे, शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज