अकलूज येथे विभागीय एअर रायफल व पिस्तूल शुटींग स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी:-अकलूज येथे क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत *जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सोलापूर* व *इंद्रधनुष्य स्पोर्टस् शूटिंग क्लब अकलूज* यांचे संयुक्त विद्यमाने *विभागीय एअर रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धा सन २०२३-२४* दि.२६,२७ व २८ ऑक्टोबर २०२३ रोजी जगदाळे कॉम्प्लेक्स,गांधी चौक, अकलुज येथे पार पडल्या. 

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी *ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत* यांच्या शुभहस्ते व प्रमुख पाहुणे *सोलापूर क्रीडा अधिकारी एस.एस धारूरकर* यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

या स्पर्धेसाठी सोलापूर, पुणे,अहमदनगर व पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील पुणे शहर,पुणे ग्रामीण,अहमदनगर शहर,अहमदनगर ग्रामीण, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व पिंपरी चिंचवड अशा सात संघामधून विविध शाळेचे खेळाडू,क्रीडा शिक्षक व रायफल शूटिंग क्लबचे प्रशिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते.हि स्पर्धा पुणे विभागातील सात संघामध्ये १४ वर्षे वयोगट मुले व मुली,१७ वर्षे वयोगट मुले व मुली,१९ वर्षे वयोगट मुले व मुली यांनी एअर रायफल पीप साइट,एअर रायफल ओपन साइट,एअर पिस्तूल शुटींग स्पर्धेमध्ये ३७८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सराटी (ता.इंदापूर) येथील *जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे* यांच्या शुभहस्ते व क्रीडा अधिकारी एस.एस.धारूरकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.या स्पर्धेच्या आयोजन अकलूजच्या इंद्रधनुष्य स्पोर्टस् शूटिंग क्लबचे अध्यक्ष व प्रशिक्षक विक्रम हनुमंत जाधव यांनी केले होते. त्यांना आनंद ढवळे व हरिभाऊ होले यांचे मोलाचे सहकार्य लाभले,या स्पर्धेसाठी पंच म्हणून अविनाश गोसावी,आकाश गुजरे,अक्षय राऊत,शुभम क्षीरसागर,कु.वैष्णवी टिंगरे यांनी पंच म्हणून काम पाहिले तसेच सार्थक बारले,आदित्य बाबर,वीर नवगण,रुद्र नवगण,देवदत्त भोईटे,अनुज जाधव,धैर्यशील मरळे यांनी सहाय्यक म्हणून काम केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

*१४ वर्षे ओपन साईड एअर रायफल* मुली,कु.गौरी अनिल नवले (प्रथम),कु्.त्रिशा सलील हजारनेस (द्वितीय),कु.राजनंदिनी रंजीत कदम (तृतीय) *14 वर्षे ओपन साईट एअर रायफल मुले* श्रीहरी कोळी (प्रथम),ओम विष्णू गांडुळे (द्वितीय),लक्ष्मण राजेश कल्याणी (तृतीय)

*14 वर्ष पीपसाईट एअर रायफल मुली* कु.ऋतुपर्णा देशमुख (प्रथम),कु.सानिका अबनावे (द्वितीय),कु.अवंतिका शेळके (तृतीय) *14 वर्ष पीपसाईट एअर रायफल मुले* प्रीतम केंद्रे (प्रथम),चैतन्य गांधाडे (व्दितीय),अनिरुद्ध अधिकारी (तृतीय) *14 वर्षे एअर पिस्तूल शूटिंग मुली* कु.आर्या मस्के (प्रथम),कु.श्रावणी भगत (व्दितीय),स्वामिनी जेजुरकर (तृतीय) *14 वर्ष एअर पिस्तूल मुले* प्रथमेश बनसोडे (प्रथम),शौर्य नवले (व्दितीय), यशराज गुजरे (तृतीय), *17 वर्षे ओपन साईड रायफल मुली* कु्.नंदिनी सर्वगोड (प्रथम),कु.नेत्रा निकम (व्दितीय),कु.गौरी ढवळे (तृतीय), *17 वर्षे ओपन साईट एअर रायफल मुले* श्रेयस रोकडे (प्रथम),अथर्व गायकवाड (व्दितीय),अविष्कार शिंदे (तृतीय), *17 वर्षे पीपसाईट रायफल मुली* कु.श्रुती दुशिंग (प्रथम),अंबिका काळोखे (व्दितीय),अनुष्का ठाकर (तृतीय), *17 वर्षे वेबसाईटवर रायफल मुले* आदित्य मदने (प्रथम),अनुज जाधव (द्वितीय),अर्जुन कदम (तृतीय),

*17 वर्षे एअर पिस्तूल शूटिंग मुली* कु.सई देशमुख (प्रथम),निर्भय गिरासे (व्दितीय),कु.यशश्री रणदिवे (तृतीय) *17 वर्षे पिस्तूल शूटिंग मुले* अक्षत घुबे (प्रथम),अथर्व भदोरिया (व्दितीय),अथर्व पावडे (तृतीय), *19 वर्षे ओपन साईड रायफल मुली* कु.निकिता रोकडे (प्रथम),कु.वैष्णवी तांबे (व्दितीय),कु.संस्कृती शिंदे (तृतीय),*19 वर्षे ओपन साईड रायफल मुले* कार्तिक कोल्हे (प्रथम),समाधान कोंड (व्दितीय),हर्षल होले (तृतीय),*19 वर्षे वेबसाईट एअर रायफल मुली* कु.वेदांती भट्ट (प्रथम),कु.श्रद्धा दिवटे (द्वितीय),कु.किरण राजमाने (तृतीय),*19 वर्षे वेबसाईट एअर रायफल मुले* हर्ष रजपूत (प्रथम),रितेश घुले (द्वितीय),यश कदम (तृतीय),*19 वर्षे एअर पिस्तूल मुली* कु.सेजल कांबळे (प्रथम),कु.श्रुती साळुंखे (व्दितीय),कु.भक्ती भरत नारायणकर (तृतीय) *19 वर्षे एअर पिस्तूल मुले* श्रीम पसाद (प्रथम),पियुष मोरे (व्दितीय), अर्जुन राजमाने (तृतीय).

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज