अकलूज येथे घडशी समाजाचे थोर कलाकार संगीतकार विश्वनाथ मोरे यांची जयंती जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेच्या वतीने साजरी 

प्रतिनिधी :-अकलूज येथे घडशी समाजाचे थोर कलाकार संगीतकार विश्वनाथ मोरे यांची जयंती जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली.

मराठी चित्रपट सृष्टीला आजरा अमर गाण्याला संगीत देऊन चित्रपटाला नाव लौकिक मिळवून देऊन महाराष्ट्रात अनेक त्यांचे पिक्चर गाजले आहेत .संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील यांनी विश्वनाथ मोरे यांना संगीत महर्षी म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाब शेठ जाधव हे होते. कार्यक्रमाला शाहीर गोरख मोहिते ,नवनाथ पवार, नवनाथ धुमाळ, किशोर जाधव, माऊली जाधव ,पप्पू वनारे, साईराम साळुंके पाटील, भाजपा माळशिरस तालुका उपाध्यक्ष समाजाशी निगडित असलेले कलाकार भोसले, वाडेकर ,कदम, गायकवाड, धुमाळ ,मोहिते ,साळुंखे, नगात ,जगताप यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.

सांस्कृतिक मंडळ कलाकार यांची मागणी शासन दरबारी प्रलंबित असून या संस्कृतिक मंडळास विश्वनाथ मोरे संगीतकार असे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटने ने शासन दरबारी मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा संघटना करीत आहे .प्रलंबित प्रश्न शासन दरबारी आहेत ते प्रश्न माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री व सांस्कृतिक मंत्री महोदय यांनी सोडवावे अशी मागणी समाज संघटने कडून होत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज