अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशाला येथे हुतात्म्यांना संगीतमय श्रद्धांजली

अकलूज दि.९ (प्रतिनिधी):
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज येथे आज दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वेळापूर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री निलेश बागाव साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
जिजामाता कन्या प्रशाला अकलूज आपल्या उपक्रमशील अध्ययन प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे.९ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या औचित्यावर विद्यार्थ्यींचे चार गट केले होते.त्यांस विख्यात गायिका श्रेया घोषाल,सुनिधी चौहान,नीती मोहन आणि नेहा कक्कड अशी नावे दिली होती.
या गटवार स्पर्धेत विद्यार्थिनींनी हे राष्ट्र देवतांचे….,हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यारे….,चला उठा रे नवयुवकांनो, छोडो कल की बाते कल की बात पुरानी,संदेसे आते है,वंदे मातरम…आणि ओ देश मेरे…  अशी एकापेक्षा एक अत्यंत बहारदार समूहगीते सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.श्रीकांत देवडीकर व विख्यात गायिका सौ.स्नेहा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक प्रशाला व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.नयना शहा या होत्या,तर याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ सुनिता वाघ,अकलूज केंद्र शाळेचे प्रमुख राजेंद्र जाधव,सौ.नरूळे,पत्रकार मगर ,राजीव लोहकरे तसेच संतोष भोसले आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग ही उपस्थित होता.
याप्रसंगी विजय गणेशोत्सव मंडळ शंकरनगर-अकलूज यांचेवतीने आयोजित समूहनृत्य स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल प्रशालेच्या शिक्षिका सौ.राजश्री कणबुर यांचाही सत्कार प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.प्रशालेच्या बाल वाद्य वृंदाच्या विद्यार्थिनींनी संगीतशिक्षक श्री ज्ञानेश्वर शेलार सरांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुरेख संगीतसाथ दिली.त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक वाय.के.माने देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण गोडसे यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री रोहित माने आणि श्री प्रल्हाद भोसले यांनी केले.
मराठी गीतांमध्ये नीती मोहन गटाने सादर केलेल्या चला उठा रे नवयुवकांनो या गाण्याचा प्रथम क्रमांक आला तर हिंदी गीतांमध्ये श्रेया घोषाल गटाच्या वंदे मातरम गीता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले श्री. दिग्विजय जाधव सर यांनी स्पर्धेचा निकाल घोषित केला.

मुलींना कायद्याने भरपूर संरक्षण दिले आहे मात्र त्याचा वापर त्यांनी केला पाहिजे.मुलींनी स्वावलंबी आणि समर्थ बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन श्री बागाव यांनी केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज