राज्यस्तरीय लावणी स्पर्धा शुक्रवार (ता.9) पासून

अकलूज ता.१: राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा शुक्रवार (ता.९) ते रविवार (ता.११) दरम्यान स्मृती भवनच्या बादशाही रंगमंचावर होणार असल्याची माहिती लावणी स्पर्धा कमिटीच्या अध्यक्षा स्वरूपराणी मोहिते पाटील यांनी दिली.

राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मोहिते-पाटील बोलत होत्या.

स्वरुपराणी मोहिते-पाटील पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेला उर्जितावस्था मिळावी यासाठी संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी समितीच्या माध्यमातून सुमारे ३२ वर्षांपूर्वी राज्यस्तरीय लावणी स्पर्धा सुरू केली. दरवर्षी नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही लावणी स्पर्धा सलग २७ वर्षे चालली. श्रीमती कै. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि जयसिंह मोहिते-पाटील व मदनसिंह मोहिते-पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५ लाख व चषक, द्वितीय क्रमांकास ३ लाख, तृतीय १ लाख, चतूर्थ ७५ हजार, पाचव्या क्रमांकास ५१ हजार तर वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट नृत्यांगना: ५ हजार व स्व. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृती चषक; उत्कृष्ट अदा: पाच हजार; उत्कृष्ट मुजरा: तीन हजार; उत्कृष्ट ढोलकी पटू, उत्कृष्ट पेटीवादक, उत्कृष्ट पार्श्वगायिका व उत्कृष्ट तबलावादक यांना प्रत्येकी एक हजार अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत शुक्रवार (ता.९) रोजी या विशेष कार्यक्रमात रेश्मा वर्षा परितेकर, जय अंबिका लोकनाटय सांस्कृतिक कला केंद्र सणसवाडी; आशा, रुपा, वैशाली परभणीकर व नंदा, प्रमिला, संगिता लोदगेकर नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, मोडनिंब; ऐश्वर्या बडदे पुणे 

दुसऱ्या दिवशी शनिवार (ता.१०) रोजी माया प्रिति खामगांवकर नटरंग सांस्कृतिक कलाकेंद्र, मोडनिंब; वैशाली वाफळेकर न्यु अंबिका लोकनाटय सांस्कृतिक कला केंद्र यवत चौफुला; गौरी सांस्कृतिक कला केंद्र येडशी जि.धाराशिव: विद्या पुजा किरण काळे रोईकर पार्टी, भोकर फाटा नांदेड ; छाया, पुजा, श्रध्दा कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र ; अक्षता वेष्णवी कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र अंबप फाटा जि. कोल्हापूर; कालिका लोकनाट्य कला केंद्र धाराशीव.

रविवार (ता. ११) रोजी ओम भगवती सांस्कृतिक कला केंद्र, नांदगांव जि. नगर ; वैशाली समसापूरकर जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी ; पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र वेळे ; नंदा उमा इस्लामपूरकर नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, मोडनिंब ; अनिता परभणीकर नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, मोडनिंब; न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, यवत ग्रुप पार्टी ; राजश्री रेश्मा जामखेडकर न्यु अंबिका लोकनाटय कला केंद्र यवत चौफुला या पार्ट्या सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज