आज अकलूज नगरपरिषद वतीने मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत मतदार जनजागृती सायकल रॅली

प्रतिनिधी :आज 18 एप्रिल रोजी सकाळी अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी SVEEP श्री. दयानंद गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषद हद्दीतून सकाळी ठीक 7.00 वाजता अकलूज नगरपरिषद कार्यालय येथून सायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

सध्या चालू असलेल्या 43- माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार टक्केवारी वाढावी म्हणुन SVEEP कार्यक्रमा अंतर्गत आज हि मतदार जनजागृती सायकल रॅली घेण्यात आली. अकलूज नगरपरिषद कार्यालय येथून सुरुवात करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्मवीर चौक,शिवाजीनगर बायपास मार्गे, माळेवाडी कॉलेज, संत सावतमाळी चौक येथून परत माळेवाडी कॉलेज, प्रतापसिंह चौक, सदुभाऊ चौक, गांधी चौक मार्गे विजय चौक, शिवसृष्टी किल्ला आणि अकलूज नगरपरिषद कार्यालय येथे येऊन सर्वांना मतदार जनजागृती शपथ देऊन समारोप करण्यात आला. यामध्ये अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी SVEEP श्री. दयानंद गोरे साहेब,श्री. राजाराम नरुटे, श्री. बाळासाहेब वाईकर,श्री. सुनिल काशिद व सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज