अकलूज नगरपरिषद व्दितीय वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा

प्रतिनिधी :-अकलूज नगरपरिषद स्थापनेला दिनांक ०३/०८/२०२३ रोजी दोन वर्ष पुर्ण झाले असल्यामुळे अकलूज नगरपरिषद व्दितीय वर्धापन दिन विविध उपक्रमाने मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त नगरपरिषद कार्यालय आकर्षक रोषणाई करण्यात आली. तसेच सकाळी दहा वाजता महादेव नगर परिसरात स.म.शं.मो.पा.लाकूड व्यापारी संघ सदस्य यांच्या उपस्थितीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील काकासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरात २०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर अकलूज नगरपरिषद व स.म. शं.मो.पा.ब्लड बँक यांच्या वतीने सर्व कर्मचारी यांच्यासाठी रक्तदान शिबीर नगरपरिषद सभागृह येथे घेण्यात आले. तसेच आरोग्य विभाग महिला कर्मचारी व सर्व कर्मचारी यांच्यासाठी मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब व डॉ. चिराग व्होरा यांच्या हॉस्पिटल मार्फत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.येथे घेण्यात आलेल्या कॅम्प मध्ये समाजात आरोग्य विषयी उपचार आणि प्रबोधन करण्यात आले.एकूण 160 कर्मचाऱ्यांना तपासण्यात आले . गरजेनुसार त्यांचे हिमोग्लोबिन, रक्तातील साखर ज्यास गरज आहे त्याचा ECG,सोनोग्राफी तसेच सिटी स्कॅन मोफत करण्यात आले.
सदर आरोग्य तपासणी शिबीर दरम्यान डॉ.व्होरा यांनी अकलूज नगरपरिषदेचे कर्मचारी विशेषता आरोग्य कर्मचारी यांना विविध प्रकारचे आजार वारंवार होत असतात,परंतु आर्थिक परिस्थिती अभावी त्यांच्यावर उपचार करायला मर्यादा येतात. तरी सदरील कर्मचाऱ्यांनी मेडीक्लेम पॉलिसी उतरविल्यास कमी खर्चामध्ये त्यांचे भविष्यातील आजारपणाच्या उपचाराची व्यवस्था / सुरक्षितता येईल असे नमूद केले.यावर मुख्याधिकारी यांनी संपूर्ण नगर परिषद कर्मचाऱ्यांचे एक मॉडेल बनवून दिल्यास नगर परिषद मार्फत त्याचा भार उचलण्या बाबत पॉलिसीचा विचार केला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी गोरे साहेबांनी यांनी दिले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज