अकलूज येथील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात “रत्नाई महोत्सव २०२३-२४” कार्यक्रमास सुरुवात

अकलूज दि.१३ (प्रतिनिधी): अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात रत्नाई महोत्सव २०२३-२४ या विविध कलागुण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवामध्ये रांगोळी स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,मेहंदी स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा,गीत गायन स्पर्धा,मूकनाट्य स्पर्धा,पोस्टर पेंटिंग स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,अंताक्षरी स्पर्धा,नृत्य स्पर्धा,बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर विविध डे ज्यामध्ये फेटा डे,जीन्स डे,बॉलिवूड कॅरेक्टर डे,मिस मॅच डे,रिजनल डे,वेस्टर्न डे,साडी डे इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ.छाया भिसे, प्रा.अमित घाडगे,डॉ.जयशीला मनोहर,डॉ.ऋषी गजभिये,डॉ. भारती भोसले,डॉ.राजश्री निंभोरकर,प्रा.के.के.कोरे, कार्यालय प्रमुख विजय कोळी, अविनाश पताळे,सुनीता काटे, दीपक शिंदे,बाळू पवार,रमजान शेख व विद्यार्थिनी परिश्रम घेत आहेत.याअनुषंगाने माजी विद्यार्थिनींना महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ.राहुल सुर्वे यांनी केले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज