सुवर्णा रामभाऊ सुरवसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अकलुज प्रतिनिधी:अकलूज (कर्मवीर चौक )येथील” विजय प्रताप हेअर सलून” चे मालक रामभाऊ सुरवसे -यांच्या पत्नी सुवर्णा रामभाऊ सुरवसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मित निधन झाले.! मृत्यू समयी त्या 40 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात -पती, १ मुलगा १ मुलगी असा परिवार असून अकलूज येथील आकलाई मंदिराजवळील वैकुंठ भूमी त्यांच्यावर दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.             

विशेषतः दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मयत सुवर्णा रामभाऊ सुरवसे यांच्या दिराच्या मुलाचे लग्न होणार होते मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला त्यामुळे या सुरवसे कुटुंबावर आनंदाच्या क्षणापूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

तसेच सुवर्णा सुरवसे यांचे( तिसऱ्याचा) सावडायचा कार्यक्रम मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी -७/३० वाजता अकलूज येथील स्मशानभूमीत होणार आहे

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज