अकलूजच्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचा दिमाखात समारोप

अकलूज  (प्रतिनिधी) :संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय भव्य लेझीम स्पर्धेचा दिमाखात समारोप झाला.

विजयचौक,अकलूज येथे तीन दिवस सुरू असणाऱ्या लेझीम स्पर्धेने परिसर दुमदुमून गेला होता. सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील या बंधूच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त त्यांचा मंडळांच्या वतीने जाहीर सत्कार ही करण्यात आला.सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते विजेतांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी दिपकराव खराडे पाटील, प्रदीपराव खराडे पाटील, महादेव अंधारे, लक्ष्मण आसबे, अभिजीत रणवरे, हर्षवर्धन खराडे पाटील यांचे सह सहकार महर्षी साखर कारखाना, शिक्षण प्रसारक मंडळ व परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपाचे युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनीही स्पर्धेस भेट देऊन खेळाडूंचे कौतूक केले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त सदरच्या स्पर्धाचे आयोजन केले होते.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय प्रा. विभाग अकलूज, द्वितीय क्रमांक महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्रा. विभाग यशवंत नगर, व तृतीय क्रमांक स.म. शंकराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर यांनी पटकावला.

मुलांच्या ग्रामीण व गटात प्रथम क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय माणकी, द्वितीय (विभागून) मोरजाई विद्यालय मोरोची व श्री चक्रेश्वर विद्यालय चाकोरे यांनी पटकावला.मु

लींच्या खुल्या गटात शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला वस्तीगृह यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला.

मुलींच्या शहरी गटात प्रथम क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, द्वितीय (विभागून) श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर व जिजामाता कन्या प्रशाला अकलूज.यांनी तर तृतीय क्रमांक (विभागून) महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर यांनी पटकावला.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रुपये ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार व सन्मान चिन्ह अशी बक्षिसे देण्यात आली. तर उत्कृष्ट प्रशिक्षक विनायक माने, उत्कृष्ट हलगी वादक लखन आरडे , उत्कृष्ट घुमके वादक गणेश चव्हाण, उत्कृष्ट सनई वादक एकनाथ केंगार यांना प्रत्येकी दीड हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज