अकलूज “त्रिमुर्ती चषक केसरी’ स्पर्धेत दिल्लीचा सुमित मलिक विजेता तर हरियाणाचा विकी हुड्डा ठरला उपविजेता

प्रतिनिधी :- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूज यांचे वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त आणि मा.श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व मा.श्री मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त दि.२९,३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२३ या कालावधीत ‘ शिवतीर्थ’ आखाडा शंकरनगर येथे त्रिमुर्ती चषक व वजनगट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यंदाचे स्पर्धेचे हे ४५ वे वर्ष असून स्पर्धेच्या अंतिम दिवशी सुरुवातीला राज्याचे विधान परिषद आमदार मा.श्री. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते आखाड्याचे पूजन करून वजनगटाच्या व नेमलेल्या

कुस्त्या लावण्यात आल्या.

यानंतर स्पर्धेचे आखाडा प्रमुख राष्ट्रकुल विजेते राम सारंग व प्रमुख पंच यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यानंतर १९८४ साली त्रिमूर्ती चषकासाठी प्रमुख पाहुणे कर्तारसिंग यांच्या बरोबर कुस्ती खेळेलेले आप्पा कदम यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री व अर्जुन पुरस्काराचे मानकरी मा. श्री. कर्तारसिंग यांचा स्पर्धेचे प्रमुख मा. चि. सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष सत्कार प्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सत्कार प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त मा.श्री. जयसिंह मोहिते-पाटील मा.श्री.मदनसिंह मोहिते- पाटील या बंधूंचा प्रमुख पाहुणे पद्मश्री व अर्जुन पुरस्काराचे मानकरी मा. श्री. कर्तारसिंग यांच्या हस्ते स. म. शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूज यांच्या वतीने सन्मानाची चांदीची गदा देऊन बंधूचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. श्री. कर्तारसिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये बोलताना सर्वप्रथम त्यांनी अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील व मा.श्री. मदनसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या ४५ वर्षापासून मोहिते पाटील परिवाराने कुस्तीची परंपरा जोपासली असून कुस्ती परंपरेला एक विशेष उंची प्राप्त करून दिली. याचबरोबर समाजकार्याच्या माध्यमातून राज्यात विकासाचे एक नवे पर्व सुरु केले. यामध्ये त्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, सहकार क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे असे सांगितले.

यानंतर त्रिमूर्ती चषक केसरी व नेमलेल्या कुस्त्या अत्यंत रोमहर्षक पद्धतीने पार पडून यामध्ये त्या-त्या गटातील त्रिमूर्ती चषकांच्या अंतिम फेरीचा थरार सुरु झाला. महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या नियमाप्रमाणे पार पडलेल्या या स्पर्धत कुस्ती शौकीनांचे डोळ्याचे पारणे फिटले. अंतिम फेरीच्या या कुस्त्या अत्यंत अतीतटीच्या व चुरशीच्या झाल्या.

याप्रसंगी विशेष लावण्यात आलेल्या कुस्त्यामध्ये पृथ्वीराज पाटील(कोल्हापूर ) विरुद्ध प्रवीण भोला (हरियाणा) यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विजयी झाला तर सतपाल सोनटक्के (कंदर) विरुद्ध समीर शेख (पुणे) यांच्यात पुण्याचा समीर शेख हा विजयी ठरला.

स्पर्धेतील त्रिमूर्ती चषकाचे विविध १५ गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे मानकरी पुढील प्रमाणे

२५ किलो – मेघराज तांबिले (अकलूज)

विश्वजीत पाटील (कोल्हापूर)

२८ किलो – संस्कार जाधव (खुडूस)

विराज पवार (निमगाव )

३० किलो – मनोज गोरड (माळशिरस)

युवराज वलेकर (खडूस)

३२ किलो-सुजल गोरड ( खुडूस)

प्रवीण गायकवाड (कारवेल)

३५ किलो- हनुमंत जाधव( खुडूस)

राजवर्धन शेंडगे (नाव्ही)

४० किलो- पृथ्वीराज चव्हाण (आटपाडी)

अंशू फोगाट (हरियाणा)

४५ किलो – योगेश गायकवाड ( पाणीव)

प्रणव हिमणे (काळमवाडी)

५० किलो- यशराज मोरे (अकलूज)

विश्वजीत लोखंडे (खडूस)

५५ किलो-अविराज माने (खुडूस)

पृथ्वीराज पाटील (वेळापूर)

६० किलो – रणजित गोरड (म्हसवड)

अजय पवार (माळशिरस)

६५ किलो – अविष्कार गावडे (सराटी)

पवन धायगुडे (करकंब)

७० किलो- वैभव पिंगारे (नादुरे)

अंकुश नैन (हरियाणा)

७५किलो-अंकित खटकळ ( हरियाणा)

अंश फौर( हरियाणा)

८० किलो- तुषार झंजे (खुडूस)

प्रणव हांडे (खुडूस)

८५ किलो- सचिन मोर (हरियाणा)

अविनाश गावडे( सराटी)

*खुला गट*

प्रथम- सुमित मलिक (दिल्ली)

द्वितीय- विकी हुड्डा( हरियाणा)

तृतीय-रजत रुहल (हरियाणा)

चतुर्थ- तुषार दुबे(पुणे)

याप्रसंगी माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते, शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी गोविंद पवार, सुप्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक रणधीरसिंग पोंगल, कुक्कड पैलवान, आंतरराष्ट्रीय पैलवान सरबजत सिंग, राष्ट्रीय प्रशिक्षक एम. आर. शर्मा, राष्ट्रीय पैलवान संजय कुक्कर, दिपकराव खराडे-पाटील, मल्लसम्राट रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख वसंत जाधव, अरविंद वाघमोडे, दादा कोकाटे, उमेश भिंगे विविध संस्थांचे संचालक व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. सामन्याचे खास शैलीतील समलोचन धनाजी मदने व सुकुमार माळी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी व राजकुमार पाटील यांनी केले. स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडल्या.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज