अकलूज येथील छोट्याशा चहा टपरी वाल्याची मुलगी झाली इंजिनिअर

अकलूज दि.२६ (प्रतिनिधी):माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे राजू काटे व राजश्री काटे या पती पत्नीने छोटेसे चहाचे दुकान आहे.घरची परिस्थिती गरिबीची पण मुलीला इंजिनिअर करण्याचे या दोघांची तीव्र इच्छा होती.त्यांच्या या निर्णयाला त्यांची मुलगी गौरी हिने प्रतिसाद देत आई वडीलांच्या कष्टाचे चीज करत आज तीने त्यांचे स्वप्न हि पुर्ण तर केले आहे.आज ती इंजिनिअरचे शिक्षण पुर्ण करत रिझल्ट लागण्यापूर्वी पुण्यातील एका खाजगी नामांकित कंपनीत नोकरीला ही लागली आहे.

घरात आई वडीलांचे जेमतेम शिक्षण झाले आहे.पण मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप काबाडकष्ट केले आहे.आईने शिलाई मशिनवर लोकांचे कपडे शिवून दिले.कधी कधी जुन्या कापडे व साड्यांची गोधडी शिवून दिली.कापडी पिशव्या शिवण्याचे काम हि केले आहे.गौरीच्या शिक्षणासाठी आईने किराणा मालाच्या दुकानात हि काम केले आहे.वडिलांनी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी विकण्याचे काम केलेले आहे.मुलीच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे शेवटी या पती पत्नीने स्वतःचे छोटेसा हाॅटेलचा व्यवसाय सुरू केला.त्यामुळे मुलीचे शिक्षण पुर्ण झाले आहे.

ग्रामीण भागात मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवायला गरीब घरातील पालक सहसा लवकर तयार होत नाहीत.पण मुलीच्या जिद्दीपुढे आई वडीलांना माघार घ्यावी लागली.आज त्यांची मुलगी गौरी काटे हिने साॅफ्टवेअर इंजिनिअर शिक्षण पुर्ण केले असून ती आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे.

गौरी काटे हिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण अकलूजच्या जिल्हा परिषद मुलींची शाळा नं.२ येथे प्राथमिक शिक्षण झाले आहे.त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जिजामाता कन्या प्रशालेत झाले आहे तर अकरावी व बारावीचे सायन्स विभागातून शिक्षण सदाशिवराव माने विद्यालयात झाले.पुढील इंजिनिअर काॅलेजचे शिक्षण कोल्हापूरच्या डी.वाय.पाटील इंजिनिअर काॅलेजमधून साॅफ्टवेअर इंजिनिअर झाले आहे.इंजिनीयर शिक्षणाचा निकाल येण्या अगोदर पुणे येथील डाटा मोटो आयटी कंपनीत तिची निवड होऊन नोकरीला लागली असून आता ती स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे.

गौरीच्या शिक्षणासाठी अकलूजच्या समृद्धी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.ज्या ज्या वेळेस शिक्षणासाठी पैसे कमी पडतील त्यावेळेस या बचत गटाने पुर्णपणे आर्थिक मदत व सहकार्य केले आहे.शिक्षण घेत असताना अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव पाटील,शिक्षक एल.डी.बाबर सर,बचत गटाच्या अध्यक्षा प्रतिभाताई गायकवाड याचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज