अकलूजमधील चार डॉक्टरांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

अकलूज :-पैशांच्या देण्या घेण्यावरून अकलूजमधील वैद्यकिय क्षेत्रात नावाजलेल्या चार डॉक्टरांनी विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर डॉक्टरांनी माळशिरस न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज सुनावणी होऊन त्यांना तात्पुरता ९ तारखेपर्यंत जामिन मंजुर करण्यात आला आहे. या घटनेने अकलूज वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    याबाबत अकलूज पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनूसार पिडीत महिला ही अकलूज येथील अकलाई हॉस्पिटल येथे काम करत होती. तिने उच्च शिक्षणासाठी ३५ हजार रूपये हॉस्पिटलकडून घेतले होते ते पैसे पगारातून वजा करावेत अशी विनंती सदर पिडीत महिलेने हॉस्पिटलकडे केली होती. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण भारत चंकेश्वरा, डॉ. सुनिल सुभाष नरूटे, डॉ. शैलेश भानुदास गायकवाड व डॉ. सचिन सावंत सर्व रा. अकलूज यांनी उसने दिलेले पैसे पगारातून न फेड करता तु आमच्याशी शारीरीक संबंध ठेव अशी त्या महिलेलेकडे मागणी करून फेब्रुवारी २०२२ ते २८ जुन २०२३ दरम्यान अकलाई हॉस्पिटलच्या डॉक्टर रूममध्ये सदर महिलेवर वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद पिडीतेने अकलूज पोलीस ठाण्यात दि. ३ जानेवारी २०२४ रोजी दिली. त्यावरून अकलूज पोलीसांनी चौघा डॉक्टरांविरोधात गु. र. नं. १०/२४, भादवि. ३७६/२, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

            या प्रकरणी सर्व डॉक्टरांनी गुन्हा दाखल होण्यापुर्वीच दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी माळशिरस न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता त्याच दिवशी सुनावणी होऊन न्यायालयाने सर्व डॉक्टरांना अंतिम सुनावणी दि. ९ जानेवारी होइपर्यंत तात्तपुरता जामिन मंजुर केला असल्याची माहिती अकलूज पोलीसांनी दिली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज