अवकाळी पावसातील उपोषणाचा दुसरा दिवस

प्रतिनिधी:- माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज येथे दिनांक 24 नोव्हेंबर पासून शासकीय कार्यालयीन वेळेत उपोषणास प्रारंभ झाला आहे.
आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट अविनाश टी. काले, पत्रकार संघाचे सचिव नागनाथ बाबुराव साळुंखे या उपोषणकर्त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे भ्रष्ट आचरणाविरुद्ध उपोषण सुरू केलेले आहे. या संदर्भातील रीतसर लेखी तक्रार उपोषणकर्त्यांनी राज्य परिवहन आयुक्त मुंबई, महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे रितसर दाखल केलेली आहे. या कारवाईला गती यावी व उपरोक्त खात्यांच्या वरिष्ठ पातळीवरून कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज