आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्याचा कॅम्प पडसाळी येथे उत्साहात साजरा

 प्रतिनिधी :- पडसाळी येथे (ता. माढा) येथे केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेत अंतर्गत आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दहा करोड गरजू परिवारांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत प्रायव्हेट आणि सरकारी दवाखान्यामध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. त्या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय पडसाळी येथे सरपंच योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पमध्ये जवळपास 250 ते 300 लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. या कॅम्प साठी माढ्याचे नायब तहसीलदार भडकवाड साहेब, मंडळ अधिकारी लऊळ गवळी मॅडम यांनी भेट दिली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उपसरपंच साधना चंद्रकांत देशमुख व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक सुर्वे मॅडम व तलाठी कांबळे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच भेंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कदम, आशा वर्कर सौ.शितल शिंदे व सौ. थोरात यांनी विशेष लक्ष दिले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज