भटक्या विमुक्त जाती जमातींना गृहचौकशी करून जातीचे दाखले द्यावेत : महेश शिंदे

अकलूज / प्रतिनिधी
राज्यातील भटक्या विमुक्त जाती जमातींना जातीचा दाखला मिळवण्यासाठी शासकीय नियमानुसार 1961 पूर्वीचा पुरावा सादर करावा लागतो. परंतु या भटक्या विमुक्त जाती जमातींना पूर्वापार पासून आपली व कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी आजवर गावोगावी वस्ती करून फिरस्ती जीवन जगावे लागत होते. त्यामुळे या समाज घटकातील बहुसंख्य कुटुंब बेघर व अशिक्षित स्थितीत आहेत. या कारणास्तव त्यांना जातीचे दाखले काढताना 1961 पूर्वीचा पुरावा सादर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच या समाजातील नव्या पिढीतील अनेक मुलांना, विद्यार्थ्यांना व होतकरूंना शिक्षणा सारख्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. अनेक शैक्षणिक व शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळेच कौशल्य व गुणवत्ता असून देखील उच्च शिक्षण घेता न आल्याने हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर फेकला जात आहे.

आणि समजा एखाद्याने परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेतलेच तरी नंतर जातीच्या दाखल्यावाचून शासकीय नोकरी व शासकीय योजनांच्या लाभा पासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या भटक्या विमुक्त समाजात बेरोजगार व सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे भटके विमुक्त समाजाचे नुकसान तर आहेच परंतु देशाचे सुद्धा नुकसान आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असून देखील भटके विमुक्तांच्या बाबतीत मात्र भेदभाव करत असल्याची भावना या समाजातील तरुणांच्या मनात असल्याचे चित्र आहे.

या कारणास्तव माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ माळशिरस तालुका कार्याध्यक्ष महेश शिंदे तथा मैत्री प्रतिष्ठान सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना या बाबतीत निवेदन देण्यात आले आहे. त्याचबरोबर येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी लोकशाही पद्धतीने प्रांत कार्यालय अकलूज समोर “आजादी दो” आंदोलन करणार असल्याचा महेश शिंदे यांच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज