भोगे वाडी येथे भर दिवसा हनुमान वस्तीवर चोरी – नागरिकांमध्ये भितीचे वातावरण 

प्रतिनिधी :-माढा तालुक्यातील भोगे वाडी येथील हनुमान वस्ती येथील दशरथ महादेव काळे या़च्या घरी दिनांक ८सप्टेंबर् रोजी दुपारी बारा ते दोनच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटाच्या चावीने कपाटं उघडून त्यातील रोख साठ हजार रुपये व पावणे दोन तोळे सोने लंपास केले.

या बाबत सविस्तर माहिती असी कि दशरथ महादेव काळे व त्यांचा मुलगा संदिप दशरथ काळे हे दोघे हि मजुरी करण्यासाठी शेतात गेले होते व त्यांची आई जनावराना वैरण आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या, याची चोरट्यांनी संधी साधून घराचे कुलूप तोडून घरातील कपाट चावीने उघडून त्यामधील साठ हजार रुपये व पावणे दोन तोळे सोने लंपास केले. या बाबत संदिप दशरथ काळे वय २२याने टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार टेंभुर्णी पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के साहेब व कॉन्स्टेबल माउली सरडे यानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या वेळी भोगे वाडी येथील पोलिस पाटील सुरेश पाटील उपस्थित होते. चोर हा माहितीतील असावा असी चर्चा येथील नागरिकातून होत आहे. या चोरीचा पोलीसांनी तपास लावावा असी मागणी होत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज