वनविभागाच्या अपयशामुळे मांगी गावासह परिसरात बिबट्याची दहशत कायम

प्रतिनिधी :- गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून मांगी, पोथरे ,कामोने शिवारामध्ये बिबट्याचा वावर दिसून येत आहे. आज पर्यंत चार ते पाच जनावर फस्त केलेले असून आता मात्र हा बिबट्या काल रविवारी मांगी गावालगत नरसाळे वस्ती जवळ दिसून आलेला आहे.
यामुळे मांगी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे असून वनविभागाच्या अपयशावरती ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या आठ-दहा दिवसापासून वन विभागाचे कर्मचारी बिबट्या चा वावर असणाऱ्या परिसरात पिंजरा लावत असून बिबट्या मात्र त्यांच्या हाती लागत नाही.
शेतकरी शेतामध्ये जायला घाबरत असून आजूबाजूच्या परिसरात बिबट्या येऊ नये म्हणून
गावांमधील नागरिक मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत आहेत.
या बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करावे अशी समस्त ग्रामस्थांची व मांगी परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे वारंवार मागणी होत आहे.

आमदार संजय मामा शिंदे यांच्या सूचनेनुसार वन विभाग कर्मचारी व त्यांची यंत्रणा रात्रंदिवस काम करत असून ते लवकरच बिबट्याला जेर बंद करतील.
तरी मांगीसह परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याच्या आव्हान केले असून वनविभाग कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांनी केलेले आहे. तसेच आपल्या परिसरात बिबट्या दिसल्यास ताबडतोब मला किंवा वन कर्मचाऱ्यांना संपर्क करावा असे आवाहन मांगी येथील पोलीस पाटील आकाश शिंदे यांनी केलेले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज