वाघोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी साकारले चांद्रयान 3 प्रतिकृती

अकलूज दि.११ (प्रतिनिधी):
माळशिरस तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चांद्रयान ३ ची प्रतिकृती करून शिक्षणाबरोबर आपल्या अंगातील कलागुणांना वाव दिला आहे.चांद्रयानची ३ ची प्रतिकृती केलेल्या विद्यार्थ्यांच्या चहे-यावर वेगळाच आनंद दिसत होता.
वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाबरोबर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम करत असते.हि शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देऊन विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते.इस्रोमार्फत पाठवलेल्या चंद्रयान 3 ची उत्सुकता चिमुकल्यांमध्ये पाहायला मिळाली.त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने अतिशय सुंदर चंद्रयान बनविले आहेत.रविराज मिसाळ,शिवतेज मिसाळ,देवराज जाधव,स्नेहल मिसाळ,शोएब बागवान,सिद्धी मिसाळ,माधुरी यादव,अथर्व गाडे, गौरी पवार,सार्थक केंगार,यश पाटोळे,प्राची मिसाळ इत्यादी तसेच इयत्ता सहावी सातवीतील अनेक विद्यार्थ्यांनी चंद्रयान बनवले आहेत तसेच त्यांच्यामध्ये चंद्रयान तीन बद्दल खूप उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळाली.
या विद्यार्थ्यांना चंद्रयान बनवण्यासंदर्भात विविध कल्पना व मार्गदर्शन दिगंबर मिसाळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र मिसाळ व सर्व शिक्षक वृंद यांनी केले.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चांद्रयानाचे सर्व पालकांमधून कौतुक केले जात आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज