संकेत भोसले खुन प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी-उत्तरेश्वर कांबळे 

 प्रतिनिधी : भिवंडी शहरातील बी एन एम काॅलेज लगत बौध्द तरूण संकेत सुनिल भोसले याला किरकोळ कारणावरून देवा धोत्रे, कैलास धोत्रे व त्यांच्या इतर साथीदारांनी फोन करून बोलावून घेतले व त्याचे अपहरण करून त्याला अमली पदार्थ पाजून पाईपने अमानुषपणे मारहाण केली .

त्यात दुर्दैवी संकेत बेशुद्ध अवस्थेत पडला शुध्दीवर आल्यावर त्याने पाणी मागितल्यावर कैलास धोत्रे व त्याच्या साथीदारांनी त्याच्या तोंडात लघवी केली व पुन्हा अमानुष मारहाण करून त्याला अज्ञात स्थळी फेकून पळुन गेले हे अमानवी कृत्य असुन महाराष्ट्रात अशा घटना सातत्याने घडत आहेत.

संकेत भोसले याचे अपहरण झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली पण स्थानिक पोलीसांनी ही घटना आमच्या हद्दीत घडली नाही असे म्हणून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.याची देखील सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून त्यांना सह आरोपी करावे. संकेत भोसलेच्या कुटुंबियांनी काही तासांच्या शोधानंतर बेशुद्ध अवस्थेत संकेत आढळून आला त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असता बुधवार दि.21 फेब्रुवारी रोजी त्याचे दुर्दैवी निधन झाले .

महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे यावेळी तालुका अध्यक्ष सुखदेव गरड,प्रविणशेठ कांबळे ,प्रशांत कांबळे ,पै.प्रेम कांबळे ,ओम गरड ,प्रतिक भैय्या कांबळे ,सिध्दार्थ ओहोळ, योगेशशेठ कांबळे ,युवराज गरड ,बलभीम कांबळे आदी उपस्थित होते

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज