एका रुपयात मिळणार पीक विमा – राज्य सरकारची नवी ‘प्रधान मंत्री पीक विमा’ योजना, शेतकऱ्यांना अनेक फायदे

प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी! यंदापासून पंतप्रधान पीक विमा योजना नुकतेच राज्य सरकारच्या वतीने बदललेली आहे. आता शेतकऱ्यांचा विमा एक रुपयात काढणार आहे. या ‘ पीक विमा’ योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामांसाठी केवळ एक रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल.

यापूर्वी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगामात २ टक्के, रब्बी हंगामात १.५ टक्के आणि नगदी पिकांसाठी ५ टक्के प्रीमियम भरण्याची अवधी होती. उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम राज्य शासन देत होते. आता यामध्ये बदल, शेतकऱ्यांना केवळ एक रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल. शेतकऱ्यांच्या हिश्शाची रक्कम राज्य शासन भरणार आहे.

पीक विमा भरण्यासाठी शेवटचे ७ दिवस बाकी

महाराष्ट्र राज्यात प्रधान मंत्री पीक विमा योजनेला सोलापूर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ओरियंटल इन्शुरन्स कंपनी कार्यरत असून दिनांक २४ जुलै २०२३ अखेरपर्यंत ३ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी दुप्पट नोंदणी झाली असून सदर अर्जाची संख्या ४ लाख होईल असे सांगण्यात येत आहे.
सदर पीक विमा योजना फक्त १ रुपया देऊन शेतकरी सहभाग नोंदवू शकतो यामुळे उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
या योजनेसाठी प्रचार रथ सोलापूर जिल्ह्यात फिरत असून सदर रथाचे उदघाटन सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक सोलापूर गावसाने साहेब यांच्या हस्ते करून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात सदर रथाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते होत असून सर्व तहसीलदार ,पंचायत समिती अधिकारी सर्व कृषी अधिकारी सर्व महसूल खात्यातील अधिकारी या योजनेच्या जाहिरात प्रसिद्धीचे काम करत आहेत. त्याचबरोबर कृषी, महसूल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या सह्यायाने उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ओरियंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी जगदीश कोळी सर यांनी दिली. सदर योजेनेपासून कोणताही शेतकरी वंचीत राहू नये आणि शेतकऱ्याला आपल्या पिकाचे संरक्षण करता यावे यासाठी या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी भाग नोंदवावा असे निवेदन केले.
पीक विमा फॉर्म भरणेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक
७/१२
अधिक माहितीसाठी संपर्क 7083697172 .

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज