गायीचे दुधाला 40 रुपये तर म्हशीचे दुधाला 75 रुपये दर न दिल्यास दुग्ध मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही :युवा सेनेचा ईशारा

वार्ताहार : शिवसेना व युवा सेना सचिव वरुण सरदेसाई ,युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखी व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील व बाभुळगावचे सरपंच भूषण भैय्या पराडे पाटील यांच्या वतीने दूध दर वाढीसाठी बाभुळगाव येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रातील दुष्काळ जन्य परिस्थिती पहाता शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे.त्यातच पशुपालन व्यवसाय अडचणीत आला आहे.सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती आणि दुध उत्पादनांवर होणार खर्च , प्रती लिटर दुधाला मिळणारा दर याचे गणित जुळविताना शेतकरयांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.दुध खरेदी बाबत शासनाचे कोणतेही धोरण नसल्याने खाजगी दुध खरेदी करणार्या संस्था शेतकऱ्यांना लूटत आहेत.अशा संस्थांवर शासनाचे कोनतेही नियंत्रण नाही. दुष्काळजन्य परिस्थितीत जनावरांनच्या चाऱ्याची कमतरता, पशुखाद्यचे गगनाला भिडलेले दर पाहता दुध उत्पादन खर्च वाढला असल्याने .गायीचे दूध ४० रुपये तर म्हशीचे दूध ७५ रुपये प्रतिलीटर असा दर द्यावा.वरचेवर दुध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढूनही, सरकारच्या नाकर्तेपणामुळे व दुध दरा बाबत ठोस निर्णय न घेतल्या मुळे शेतकऱ्यांना मात्र लाभापासून वंचित रहावे लागत आहे.खरा मलिदा मात्र दुध खरेदीदारच खात आहेत.सध्याच्या खोके सरकारने शेती व्यवसाय अडचणीत आणला आहे .सत्तेत आल्यापासून शेतकरी हिताचा एकही निर्णय घेण्यात आला नाही.दूध दरवाढ केली नाही तर सरकारला येणाऱ्या काळात याची खुप मोठी किंमत नक्कीच मोजावी लागेल .दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने मागणी करण्यात येते की आपण शेतकऱ्यांनच्या मागणी नुसार तात्काळ दुध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात पाऊल ही ठेवू देणार नाही असा ईशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके चंद्रकांत पराडे,बबलु पाटील, अविनाश पराडे, सागर साळुंखे, अशोक पराडे,सुनील पराडे, संग्राम पराडे, गणेश गोडसे , संतोष पराडे, गणेश पराडे,अक्षय पराडे,धनाजी सुरवसे, गणेश चव्हाण,आबा साठे,दादासो गोडसे,समाधान पराडे सिताराम पराडे राजाभाऊ पराडे दयानद इंगळे गणेश काळे लालासाहेब भोई प्रतिक इंगळे प्रथमेश भोई आबा कुंभार ई शेतकरी युवा सैनिक उपस्थित होते …!

शासनाने 3.5 फ्याट ला 34 रुपये दर ठरवून दिला आहे पण प्रत्येक जिल्ह्यात दूध संघ वाले दर वेगवेगळा देत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात 33 रुपये सातारा पुणे जिल्ह्यात 31रुपये तर सोलापूर जिल्ह्यात 26 रुपये शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळत आहे व शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे जर शासनाने या कडे लक्ष नाही दिले आणी शेतकरांच्या गाई चे दुधाला 40 रुपये व म्हशीच्या दुधाला 75 रुपये दर द्यावा अन्यथा दुग्ध मंत्राला सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही – गणेश इंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज