धर्मपुरी येथे शेतकऱ्यांना कंपोस्ट खत तयार करण्याचे मार्गदर्शन

प्रतिनिधी :- रत्नाई कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी धर्मपुरी गावातील शेतकन्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

शेतकन्यांना खत आणि पाण्याच्या संतुलित वापराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जमिनीचा कस टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर कपोस्ट खताचे महत्त्व सांगण्यात आले. अतिरिक्त खत आणि पाण्याच्या वापरामुळे जमिनीवर याविषयी होणारे विपरीत परिणाम माहिती दिली याविषयी प्रात्यक्षित घेत असताना गावातील शेतकरी व शेतकरी महिला उपस्थित होते. प्रात्यक्षिकेच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा एम. एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी व प्रा. एस. आर. आडत यांचे मार्गदर्शनानुसार कृषिदूत शेखर पठाडे, अनुप परदेशी, अनिकेत सरवदे, रोहन पाटील, ओंकार पाटेकर, प्रशिक नगराळे, विशाल पराडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज