स्वातंत्र्यदिनानिमित्त धर्मपुरी येथे वृक्षारोपण

dharmpuri

प्रतिनिधी :-धर्मपुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत स्वातंत्र्यानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एम एकतपुरे, प्रोग्राम ऑफिसर प्रा. एम. एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिदूत शेखर पठाडे, अनुप परदेशी, अनिकेत सरवदे, रोहन पाटील, ओंकार पाटेकर, प्रशिक नगराळे, विशाल पराडे, ऋतिक गायकवाड यांनी आंबा, नारळ, सिताफळ, चिकु या झाडाची वृक्षारोपण केले. यावेळी कृषिदूत व धर्मपुरी मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वृक्षरोपणाची गरज व त्याचे फायदे व वृक्षसंवर्धन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले व यापुढील कार्यक्रमांमध्ये अश्याचप्रकारे वृक्षरोपण करून निसर्गाचे संतुलन कसे ठेवता येईल याबद्दल माहिती दिली व ” झाडे लावा झाडे जगवा ” असा प्रण घेतला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज