धर्मपुरी येथे चारा उपचाराचे प्रात्यक्षिक

प्रतिनिधी :-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज तर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम दरम्यान धर्मपुरी येथे कृषीदुत शेखर पठाडे, अनुप परदेशी, अनिकेत सरवदे,रोहन पाटील, ओंकार पाटेकर, प्रशिक नगराळे,विशाल पराडे यांनी शेतकऱ्यांना युरिया व गूळ यांचा वापर करून चारा उपचार कसा करावा व त्याचे फायदे काय याबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी साधारणत एक लिटर पाण्यात ५०० ग्रॅम गूळ ५० ग्रॉम मीठ व ९ ग्रॅम युरिया एकजीव करून १ किलो वाळवलेल्या चाऱ्यावर शिंपडून मिश्रण केले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. हा चारा गुरांना दिल्यामुळे त्याची पचनशक्ती वाढून त्यांना पोषकद्रव्ये मिळतात या कार्यक्रमाकरिता त्यांना विषय शिक्षक प्रा. डी. एस. मेटकरी तसेच रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलवडे, समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर  आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले

त्यावेळी धर्मपूरी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज