अकलूजच्या डॉ.अर्चना गवळी ठरल्या मिसेस आशिया इंटरनॅशनल गोल्ड विनर 2023 च्या मानकरी

प्रतिनिधी :-पुणे कोरेगाव पार्क येथे सिद्धी फाऊंडेशन तर्फे स्टार डायमंड मिस,मिसेस,मिस्टर आणि किड्सच्या आशिया इंटरनॅशनल ॲवॉर्ड २०२३ च्या स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धमध्ये मिसेसाठी एकूण २० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.त्यामध्ये अकलूज येथील डॉ. अर्चना गवळी यांना मिसेस आशिया इंटरनॅशनल गोल्ड विनर २०२४ चा किताब मिळवला.

अर्चना गवळी या १५ वर्षे झाले गवळी हॉस्पिटल मॅटरनिटी सर्जिकल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर अकलूज येथे रुग्णांची सेवा करीत आहे.यासोबतही ते सामाजिक, कला,क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहे.त्या निमा वुमेन्स फोरमच्या त्या उपाअध्यक्ष आहे.इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी होत्या.रोटरी क्लबमध्ये पण त्या सदस्य होत्या.या अंतर्गत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.त्यमध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण,महिलांचे विविध तपासण्या,विविध ठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात मार्गदर्शन ही त्यांनी केले आहे.

डॉ.अर्चना गवळी या मिसेस इंडिया अर्थ २०२३ टायटल ब्युटी विथ कँप्याशन मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र वन ऑफ द रेपुटेशन पेजेंट आहे.तसेच त्यांनी खूप ठिकाणी ज्युरी म्हणून काम पाहिले आहे,तसेच त्या कॅरम आणि चेस मधे चॅम्पियन आहे. अकलूजच्या डॉक्टर टीमच्या त्या कॅप्टन आहे त्या डॉक्टरच्या क्रिकेट तर्फे राज्यस्तरीय क्रिकेट मध्ये पण सहभागी झाल्या होत्या.डॉअर्चना गवळी सर्व क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी मिसेस आशिया इंटरनॅशनल गोल्ड विनर २०२३ हा किताब मिळवला असून त्यांच्यावरती विविध क्षेत्रातून मान्यवरांचा शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज