भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण व संत गाडगेबाबा स्वछता अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल गौरव सोहळाचा आयोजन

प्रतिनिधी (मुंबई ):- महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त संत गाडगेबाबा स्वछता अभियान अंतर्गत चैत्याभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात दि ७ डिसेंबर २०२३ रोजी सालाबादप्रमाणे विविध संस्था आणि स्वयंसेवक यांनी स्वछता आणि उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल घन कचरा व्यवस्थापन खाते जी उत्तर विभाग, बृहन्मुंबई महानगर पालिका मार्फत सर्व सहभागी सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक यांचा सामाजिक बांधिलकी सक्षमपणे पार पाडल्यामुळे गौरव सोहळा आज दि २१ डिसेंबर २०२३ रोजी, जी उत्तर कार्यालयात सहायक आयुक्त श्री प्रशांत सकपाळे साहेबांच्या हस्ते पार पडला तसेच घन कचरा व्यवस्थापन, जी उत्तर विभागाचे चे अधिकारी श्री काझी साहेब यांनी विभागात स्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाल्यास सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही दिली. सहायक आयुक्त श्री प्रशांत सकपाळे साहेब व घन कचरा व्यवस्थापन, जी उत्तर विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका चे कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्री जितेंद्र कांबळे (भाजपा वडाळा विधानसभा उपाध्यक्ष) सह अनेक मान्यवर व पदाधिकारी होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज