डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे यांना अनुसूचित जाती-जमाती बचाव समिती, माळशिरस तालुक्याचे निवेदन- लालासाहेब अडगळे


अकलूज प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (बार्टी) स्थापन झाली, तेव्हापासून सरकारने अनेक सरकारी योजना ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचायला हव्यात, त्या पोहोचू लागल्या आहेत. इतकेच नव्हे, तर हि संस्था विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजात प्रबोधन करण्याचे काम करीत आहे.

या संस्थेला अनुसूचित जाती सर्व समाजातूनही अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनुसूचित जातींच्या मुलांना उच्चशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवा क्षेत्रात भरारी घ्यायची आहे, अशा मुलांना देखील मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहच टरण्याचे काम ख-या अर्थाने बार्टी कडून होत आहे. ५ जुलै २०१४ रोजी झालेल्या बैठक मंडळात एकमताने पास झालेल्या ठरावानुसार बार्टीच्या महत्त्वाकांक्षी समतादूत प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. ११ महिन्यांचा कालावधी असणारा हा ‘समतादूत पथदर्शी प्रकल्प राज्यात चालविला गेला. १९८९ च्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जाणीव, प्रतिसाद आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व समाजातील भेदभाव, जातीयवाद या मूलभूत तत्त्वांचे उच्चाटन करून भेदभाव नष्ट करणे, हा या प्रकल्पाचा हेतू होता. हा उद्देश सफल होत आहे, विशेष म्हणजे राज्य सरकारकडून बार्टी या संस्थेला कोटी रुपयांचा निधी मिळत आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सर्व बाबींचा विचार केला तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या घटकांना या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबविले जातात. हे देखील माहित नाहीत. ज्या समतादूतांनी बार्टी आणि तिचे प्रकल्प गावोगावी पोहोचविले आहेत. असे भासवले जाते परंतु माझ्या माहितीप्रमाणे माळशिरस तालुक्यात कोणतेही उपक्रम झालेले नाहीत.असे मत अनुसूचित जाती जमाती बचाव समितीचे लालासाहेब अडगळे यांनी व्यक्त केले.

राज्यात सध्या अंदाजे ४४७ समतादूत कार्यरत आहेत. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बार्टीकडून राबविले जाणारे उपक्रम चांगले आहेत, याची कल्पना आमच्या माळशिरस तालुक्यात अजून माहित ही नाही तेव्हा या सर्व बाबींचा विचार होऊन माळशिरस तालुक्यात नव्याने समतादूत नियुक्त करून उद्योजकता विकास व प्रशिक्षण कार्यक्रम या संस्थेचे शिबिर राबवण्यासाठी तात्काळ नियोजन व्हावे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे यांना अनुसूचित जातीजमाती बचाव समिती, माळशिरस तालुका यांनी निवेदन देऊन विनंती केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या निबंधक सौ. इंदिरा आस्वार मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. व माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती साठी लवकरच या कार्यक्रम नियोजन करु असे आश्वासन दिले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज