ड्रोनने रशियावर रात्री हल्ला

 

रशिया (मॉस्को ):रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र होत असून थांबण्याचं नाव घेत नाही. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेंनीही रशियाच्या हल्ल्याना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनने मॉस्कोवर शनिवारी रात्री ड्रोननी हल्ला करून काही इमारतींचे नुकसान केले. हल्ल्यामुळे शहरातील विमानतळ ही काही काळ बंद ठेवावे लागले. आणखी काही ड्रोन पाडण्यात रशियाला यश आले आहे. युक्रेनने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध फेब्रुवारी 2022 पासून चालू आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन म्हणाले कि आम्ही शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यास तयार आहे पण युक्रेनने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही जशास तशे उत्तर का देणार नाही?

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज