भटक्या विमुक्त जाती जमाती रेशन कार्डच्या अटी शिथिल करून मार्ग मोकळा – महेश शिंदे

प्रतिनधी  :-दि- 5 डिसेंबर 2023 रोजी तहसील कार्यालयामध्ये मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन दिले होते व त्याचा पाठपुरावा करून अखेर रेशन कार्ड च्या कागदपत्राच्या अटी रहिवाशी पुरावाच्या आधारे म्हणजेच तलाठ्याचा रहिवासी दाखला किंवा मंडल अधिकाऱ्याचा चौकशी दाखला तसेच आधार कार्ड विहित नमुन्यातील अर्ज याची पूर्तता करून ऑनलाईन दाखल करून भटक्या विमुक्त जाती जमाती मधील ज्या कागदपत्राच्या अटी होत्या त्या अखेर शिथिल करण्यात आल्या आहेत.मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार तहसील कार्यालयातून सकारात्मक पत्र काढल्यामुळे तहसील कार्यालयाचे महेश शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत व सर्व भटक्या विमुक्त जाती-जमाती मधील घटकांना आवाहन केले आहे की सर्वांनी रहिवाशी पुरावाच्या आधारे रेशन कार्ड उपलब्ध करून घ्यावे.हा महत्वपूर्ण प्रश्न सोडवल्यामुळे महेश शिंदे यांचे जनतेतून कौतुक होत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज