एम्पॉवरमेंट पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सुनीताताई तूपसौंदर्य यांची जनकल्याण मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था. संचलित विठाई वृद्धाश्रम मायेची सावली या वृद्धाश्रमास भेट

प्रतिनिधी :- माळशिरस येथील पिसेवाडी या ठिकाणी महिला एम्पॉवरमेंट पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. सुनीताताई तूपसौंदर्यजी यांनी जनकल्याण मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था. संचलित विठाई वृद्धाश्रम मायेची सावली या वृद्धाश्रमास भेट दिली. या वेळी आश्रमातील वृद्धांच्या तब्येतीची विचारपूस केली व वृद्ध आश्रमास लागणारे आवश्यक वस्तू व इतर जागा अभावी होणारी अडचण दूर करू असे आश्वासन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिष्ट मंडळ यांना देण्यात आले. संस्थेने राबवलेले सामाजिक उपक्रम सर्व महामानवांच्या एकत्रित जयंती, रक्तदान शिबिर , वृद्धांचा सन्मान सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व विद्यार्थ्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित तसेच पोलीस प्रशासन यांची आरोग्य तपासणी शिबिर असे अनेक उपक्रम या संस्थेच्या वतीने राबविण्यात आले. या कार्यक्रमाचा अहवाल सादर करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संतोष (भाऊ) खंडागळे प्रदेशाध्यक्ष सुनिता साठे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगीता साठे, MEP पार्टीचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब लोखंडे , सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख मकरंद (भाऊ) साठे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ सकट, तसेच दिगंबर साठे सर आधी पार्टीची नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज