अकलूज येथे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

अकलूज (प्रतिनिधी):अकलूज काझी गल्लीतील मोदी निवास येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सोलापूर जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री मुख्तार भाई कोरबू यांच्या शुभहस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सोलापूर जिल्हा भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे,डॉ. निलेश ननवरे,सुभाष गोसावी, बाळासाहेब लोखंडे इम्रान बागवान,प्रशांत साळुंखे, मुजम्मिल कोरबू आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा व अकलूज शहर भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज