गांधीजींची अहिंसा समजुन घ्यावी लागेल-डॉ.विश्वनाथ आवड

प्रतिनिधी:-
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यप्रसिद्धी सप्ताह समारोप प्रसंगी आज महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय “अहिंसा दिन” तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड यानी ‘महात्मा गांधीजी समजून घेताना’ या विषयावरती विचार मांडले.

ते पुढे म्हणाले की,जागतीक पातळीवरील नेत्यांनी महात्मा गांधी सर्वांना माहित आहेत पण ते समजून घेतले पाहिजेत.१९२३ चा भारत, २०२३ भारत या शंभर वर्षाच्या भारताचे अंतर ध्यानात घ्यावे लागेल.१९२३ ला राष्ट्र होते पण भारत देश स्वतंत्र झालेला नव्हता.त्यावेळेस नव्वद टक्के लोक निरक्षर,कुपोषीत,गरीबीच्या खाली जीवन जगणारे होते.त्यांना सोबत उभे करण्याचे काम १९१४ ते १९४७ या काळात गांधीजीने केले.त्यासाठी लोकांना नेता आपला वाटला पाहिजे या हेतून कार्यक्रम दिला.असहकाराचा, सत्याग्रहाचा,अहिंसेचा,सत्याग्रह हा शब्दाची ताकद गांधीजींनी ओळखली म्हणूनच अनेक नेते गांधीजींनी सामान्य कार्यकर्ते बनविले.चिरंतन शाश्वत विकासाचे मॉडेल गांधीनी मांडले, मारेंगे नही लेकिन मानेंगे भी नही या मुलमंत्राने जनतेला राष्ट्रीय जनआंदोलनात सहभागी होण्यास भाग पाडले.अहिंसा केवळ हिंसा ठाळून साध्य होणार नाही तर विचाराने व कृतीने होणारी हिंसा सुध्दा गांधीजींना मान्य नव्हती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे होते. याप्रसंगी ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.राजकुमार इंगोले, डॉ.शिरीष शिंदे,डॉ.जनार्दन परकाळे,डॉ.चंकेश्वर लोंढे व स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.अजित चंदनकर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय मगर,डॉ.सज्जन पवार,प्रा.स्मिता पाटील व कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज