गणेशगांव येथील श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय मुलांना वह्याचे वाटप

अकलूज दि.१० (प्रतिनिधी):माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नेहमीच गोरगरीब लोकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी सतत मदतीचा हात पुढे असतो.यामध्ये जिल्हा परिषद शाळेना तीन व अंगणवाडीला दोन लॅपटॉपचे वाटप करण्यात आले होते.कधी भक्ती मार्गातून कधी प्रवचने तर कधी किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

आज गणेशगांव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व लवंग (२५/४) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील मुलांना वह्याचे वाटप श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव दशरथ महादेव मोरे-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यापुर्वी ही २६ जानेवारी या दिवशी गरजू गरीब लोकांना व ऊसतोडणी कामगारांना दोनशे ब्लॅंकेट्सचे वाटप या चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत करण्यात आले होते .

या प्रसंगी फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संचालिका नूरजहाँ शेख व गणेशगांव जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक दत्तात्रय धोकटे यांनी ट्रस्टींचे आभार मानले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज