गणपती फार्मसीचे विद्यार्थी विभागीय खो – खो स्पर्धेत विजयी

प्रतिनिधी : अकोले (खु). ता. माढा येथील गणपती फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विभागीय खो – खो स्पर्धेत सहभाग नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाने राज्य स्तरीय विभागीय खो-खो स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मासी, वडाळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती.या विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेत एकूण 15 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी संघाने व्ही डी एफ कॉलेज ऑफ फार्मसी लातूर विरूद्ध मॅच लढून विजय मिळवला. या स्पर्धेत सुमीत बरकडे, विकास नाळे, विकास अनपट, प्रसाद वारे, सचिन भिंगारे, स्वप्नील भोगे, हर्षल भिल, जिवन गावडे, अभिजीत शिंदे, ऋषिकेश गुट्टी, राहूल माने, तुषार बनसोडे यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष अॅड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ.रुपाली बेंदगुडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील या संघास प्रा.अक्षय भेंकी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज