ग्रीन फिंगर्स महाविद्यालयांमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी :-दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रथम वर्षातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आपापल्या पाल्याच्या प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले पूर्वी असे मिळावे अपवादाने होत असत परंतु अलीकडे बदलत्या तंत्रज्ञान व शिक्षण व्यवस्थेच्या काळात असे मिळावे आयोजित केले जात आहेत .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुभाष शिंदे सर यांनी केले .

त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व पालक व विद्यार्थ्यांना संस्थेचे ध्येय व धोरणे तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक धोरणाबद्दल विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले उच्च शिक्षण घेणारा आपला पाल्य महाविद्यालयात नेमके काय करतो हे जाणून घेण्यासाठी आपण वेळोवेळी महाविद्यालयात येऊन प्राध्यापकांशी संवाद साधला पाहिजे . त्याचबरोबर आपल्या पाल्याची उत्तम जडणघडण होण्यासाठी पालकांनी वरचेवर महाविद्यालयात येणे गरजेचे आहे .

शिक्षक पालक मेळाव्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर राजगुरू सर यांनी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजीच्या युगात आपण घेत असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण खूप महत्त्वाचे आहे आजचे युग संगणक प्रणाली व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे .विद्यार्थ्यांनी बदलत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्यपूर्ण अभ्यास करणे खूप आवश्यक आहे . तसेच आपल्या मार्गदर्शनातून बोलताना पुढे ते म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे ग्रीन फिंगर्स महाविद्यालय हे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय असून या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी उच्च व चांगल्या पदावर कार्यरत आहे ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे .

या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम वर्षातील सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रमुख पाहुणे डॉ . संतोष राजगुरू सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . विश्वनाथ आवड सर प्राचार्य डॉ . सुभाष शिंदे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला .

यामध्ये बीएससी ईसएस प्रथम वर्षात कुमारी अदिती अनिल पराडे हिने ८४.७५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला असून कुमारी वैभवी विजय नगरे हिला ८२.७५ टक्के गुण मिळालेले असून तिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे कुमारी भूमिका विजयसिंह मगर हिने ८२.२५ % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे तसेच बीसीए विभागातील नेहा संतोष सूर्यवंशी हिने ७९.५० % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला असून आरती दत्तात्रय पिलाने हिने ७७.७५ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच पायल संजय रसाळ हिने 75.75 % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे .

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्माननीय मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयीन विकास समिती सदस्य डॉ . विश्वनाथ आवड सर या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हणाले उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .सर्व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाविद्यालयाचे प्रशासन व अध्यापनाबद्दल जी कौतुकाचीताप दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे . आपल्या संस्थेत प्राध्यापकाची निवड करताना त्यांची

अभ्यासु वृत्ती , व्यासंग वृत्ती ,ज्ञान यांना प्राधान्य दिले जाते .

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी आपण ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या ताबडतोब पूर्ण करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन प्रयत्न करेल . या पालक मेळाव्याच्या कार्यक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कुमारी अदिती अनिल पराडे व वैभवी विजय नगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कुमारी श्वेता कंगळे यांनी केले . तसेच कार्यक्रमाचे आभार चे विभाग प्रमुख डॉ . तुळशीराम पिसाळ यांनी मानले .

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .महेश ढेंबरे ,बीसीए विभागप्रमुख प्राध्यापक बाळासाहेब क्षीरसागर,

एम एस सी विभाग प्रमुख प्राध्यापक संजय साळुंखे , अंतर्गत गुणवत्ता समिती कक्ष समन्वयक प्राध्यापक अनिल लोंढे महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते .

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज