सेन्ट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्लीच्या नॅशनल व्हाइस प्रेसिडेंट पदी ॲड.एम.जी. तांबोळी यांची निवड

अकलूज दि.१४ (प्रतिनिधी):प्रसिद्ध कायदेतज्ञ,सामाजीक कार्यकर्ते,भारत भूषण पुरस्कार प्राप्त ॲड.एम.जी.तांबोळी यांची सेन्ट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्लीच्या नॅशनल व्हाइस प्रेसिडेंट पदी निवड करण्यात आली.

या सत्कार प्रसंगी बोलताना तांबोळी वकील म्हणाले की, मानवी हक्क अधिकार,मूलभूत अधिकार,लोकांच्या प्रश्नांसाठी व समाजासाठी सेवा करण्यासाठी ही मोठी संधी आहे.येणाऱ्या काळात मानव अधिकारांचा आवाज बुलंद करून न्यायासाठी झगडणार असल्याचे त्यांनी सांगितले

अधिकृत निवडीचे पत्र आय कार्ड त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी लीगल अडव्हयझर धनंजय बाबर,नॅशनल प्रेसिडेंट डॉ.कुमार लोंढे,महाराष्ट्र उपाध्यक्ष भैय्या बाबर,डायरेक्टर बाळासाहेब काटे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वजाळे इ.उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज