माढा व जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न- धैर्यशिल मोहिते-पाटील 

अकलूज -प्रतिनिधी / माढा व करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळविण्यासाठी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी पत्र लिहून प्रवासी थांब्याची मागणी केली आहे.

    सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर व माढा रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.पुण्याला दररोज शाळा काॅलेजचे विद्यर्थी,नोकरदार वर्ग,हाॅस्पीटल्स करीता ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.  

या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईकरता हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा आवश्यक आहे.सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास या शहरातील नागरिकांना मोठा फायदा होईल तसेच शिक्षण व्यवसायांच्या दृष्टीने या शहरांच्या विकासाला चालना मिळेल.दळण वळणाच्या दृष्टीने हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा सोयीचा व गरजेचा असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरवा करणार असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज