भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन

अकलूज:-२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

अकलूज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले म्हणाले की या देशाला समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हक्क बहाल करण्याचे महान काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.हे संविधान निर्माण करण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले.आजच्या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान त्याकाळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना बहाल केले आणि त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच 26 जानेवारी पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे,तालुका संघटक पांडुरंग चव्हाण, तालुका खजिनदार विश्वास उघाडे,अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे,आकाश गायकवाड,सया शिंदे,वैभव अंबुरे,सागर कोळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज