अकलूजच्या इंद्रधनुष्य स्पोर्ट्स शूटिंग क्लब येथे जिल्हास्तरीय एअर रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी :-क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व इंद्रधनुष्य स्पोर्टस् शूटिंग क्लब अकलूज यांचे संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हास्तरीय एअर रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धा सन २०२३-२४ दिनाक १४ व १५ सप्टेंबर रोजी इंद्रधनुष्य स्पोर्ट्स शूटिंग क्लब जगदाळे कॉम्प्लेक्स येथे पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर क्रीडा अधिकारी एस.एस. धारूरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटीचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे व जिल्ह्यातील विविध शाळेंचे क्रीडाशिक्षक व विविध रायफल शूटिंग क्लबचे प्रशिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये वयोगट १४,१७, व १९ गटांमध्ये मुले व मुली यांचे स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धा पार पडल्यानंतर स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी एस.एस. धारूरकर,माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी एस.व्ही मरळे,क्रिडा शिक्षक दिपाली सातपुते,पुण्याचे पालकमंत्री यांचे सहाय्यक देशमुख साहेब यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला.या स्पर्धेसाठी पंच म्हणून अविनाश गोसावी, आकाश गुजरे,अक्षय राऊत, हरिभाऊ होले,आनंद ढवळे, देवदत्त भोईटे,वैष्णवी टिंगरे यांनी काम पाहिले.

या स्पर्धेमध्ये इंद्रधनुष्य स्पोर्टस् शूटिंग क्लबचे पाच विद्यार्थ्यांचे पुढील विभागीय स्तरासाठी निवड झाली,त्यामध्ये एअर पिस्तूल शूटिंगमध्ये १७ वर्ष वयोगट मुले १) सकलेन मुस्ताक नदाफ (द्वितीय क्रमांक) २) पृथ्वी दत्तात्रय माने-देशमुख (तृतीय क्रमांक),१९ वर्ष वयोगटांमध्ये १) ज्ञानेश्वरी हनुमंत भांगे (प्रथम क्रमांक) तसेच एअर रायफल शूटिंग मध्ये वयोगट १७ वर्ष वयोगटामध्ये १)अनुज दिनेश जाधव (द्वितीय क्रमांक),१९ वर्ष वयोगटांमध्ये १) धैर्यशील सिद्धेश्वर मरळे (प्रथम क्रमांक) या विद्यार्थ्यांची निवड झाली.यांना इंद्रधनुष्य स्पोर्टस् शूटिंग क्लबचे अध्यक्ष तसेच प्रशिक्षक विक्रम हनुमंत जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज