जनसेवा रिक्षा स्टॉप तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त 126 किलो जिलेबी वाटप

अकलूज प्रतिनिधी दि.२६ : येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील जनसेवा रिक्षा स्टॉप च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त 126 किलो जिलेबी वाटप करण्यात आले. अकलूज नगर परिषद मुख्याधिकारी दयानंद दादासाहेब गोरे, नॅशनल युनियन बॅकवर्ड, एस सी, एस टी अँड मायनॉरिटीज चे राज्य प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, ॲड वजीर शेख,ॲड प्रविण कारंडे,जावेद बाबा तांबोळी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते जिलेबी वाटप झाले. याप्रसंगी पत्रकार शशिकांत महादेवराव कडबाने, नौशाद मुलाणी, गणेश जाधव, नीलकंठ हजारे, सोमनाथ खंडागळे, सुधीर रास्ते, राजाभाऊ गुळवे, नितीन निंबाळकर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपजिल्हा रुग्णालय अकलूज मधील रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी तसेच बज्मे सुफिया मदरसा व जामिया बरकाते फातिमा मदरसा अकलूज येथेही जनसेवा रिक्षा स्टॉप च्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी नियमितपणे विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय अकलूज समोरील जनसेवा रिक्षा स्टॉप चे अध्यक्ष संतोष महादेव कोंढारे, उपाध्यक्ष नाझीम सय्यद, कार्याध्यक्ष कुमार चव्हाण, सचिव मौला मकानदार, खजिनदार अमीर मुलाणी, जुबेर बागवान वाईट पठाण, समाधान बाळू गवळी इत्यादींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज