जेऊर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद

प्रतिनिधी:-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटा जि.जालना येथे उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील माता भगिनींवर अमानुष लाठी हल्ला व गोळीबार झाला .त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र मध्ये उमटले त्या घटनेच्या निषेधार्थ बंद करण्यात आला. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते बाळासाहेब तोरमल बोलताना म्हणाले झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून लवकरात लवकर त्यावर कडक कारवाई करण्यात यावी. व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सकल मराठा समाजाची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.

यानिमित्ताने पुकारलेल्या बंदला मराठा समाजाने, जेऊर व्यापारी वर्गाने व जेऊर ग्रामस्थांनी 100% पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कुंजीर साहेब जेऊर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अतुल निर्मळ, ता. अध्यक्ष सुहास पोळ नाना पोळ, पिंटु जाधव ,अदिनाथ माने, बालाजी गावडे ,सोमनाथ रोकडे ,दत्तात्रेय आहेरकर, मयूर रोकडे, आबा झाडे ,निलेश पाटिल, धनु गारुडी, शुभम रोकडे ,राजेश रोकडे, महेश शिंदे, वैभव मोहिते, किशोर कदम, नागेश खराडे ,जय चोपडे, हनुमंत अदलिंग, किरण गायकवाड, शुभम सूर्यवंशी, शंकर जाधव, गणेश मोहिते, संतोष कांबळे ,अविनाश घाडगे, आजिनाथ पांढरमिसे ,सकल मराठा समाज व असंख्य बहुजन बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज