ऑनलाइन हॅकरच्या ज्यूस जॅकिंग चोरीच्या प्रकारामुळे पोलीससां पुढे मोठे आव्हान

प्रतिनिधी :-हैदराबादमधील एका मोठ्या कंपनीच्या सीईओच्या खात्यातून १६ लाख रुपये ऑनलाइन गायब केले गेले. ओटीपी दिला नव्हता, कॉल नव्हता, ऑनलाइन लिंक पाठवली किंवा उघडली नव्हती. सीईओ स्वत: अतिशय Techno savvy आहेत. एवढी रक्कम कशी चोरीला गेली हे कळायला मार्ग नव्हता. सायबर क्राइम क्षेत्रातील निष्णात अधिकारी या प्रकरणात माथेफोड करीत होते मोबाईलचे काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्यात आले पण कोणताही मागमूस लागला नाही.अखेर त्याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमधून क्लू सापडला.

सीईओचा मोबाईल चार्जर ऑफिसमध्ये बदलण्यात आला आणि त्याच्या जागी दुसरा यूएसबी चार्जर (अगदी एकसारखा मेक/मॉडेल) बसवण्यात आला होता. कार्यालयीन वेळेनंतर काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याने अशी बेमालूम अदलाबदली केली होती. त्या नवीन चार्जर च्याच माध्यमातून सर्व डेटा कॉपी करण्यात आला, संपूर्ण मोबाइल बँकिंग हॅक करण्यात आले आणि खात्यातून अगदी सहजतेने रक्कम लंबाविण्यात आली. या मोडस ऑपरेंडीमध्ये, चार्जर प्रथम बदलला जातो आणि त्या बदललेल्या चार्जरमध्ये आधीपासूनच एक मायक्रो चिप स्थापित केली जाते आणि सर्व डेटा कॉपी आणि हॅक केला जातो.अर्थात हे लक्षात येणे खूप कठीण, त्यामुळे चार्जर आणि यूएसबी कॉर्डवर विशेष लक्ष ठेवा. त्यांना तुमच्या ऑफिसमध्ये तसेच सोडून जाऊ नका आणि दुसऱ्याचाही वापरू नका किंवा अज्ञात ठिकाणी तुमचा मोबाईल चार्ज करू नका. विमानतळ/मॉल/क्लब इत्यादींमध्ये लटकणारे चार्जर/फ्री चार्जिंगच्या मोहात पडू नका. आणि जेव्हा तुम्ही परदेशात जाल तेव्हा मॉल्स/रेस्टॉरंट्स/पर्यटक कोच इत्यादींमध्ये मोफत वायफाय पासवर्डला बळी पडू नका. या फसवणुकीच्या प्रकाराला juice jacking म्हणतात .

त्यामुळे मोबाईल वापरताना नागरिकांनी सावधान राहण्याचे आव्हान पोलिसांनी केलेले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज