दि मॉडेल विविधांगी प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

अकलूज दि.३ (प्रतिनिधी)-भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे विविध उपक्रमाने व बक्षिस वितरण समारंभाने साजरी करण्यात आली. 

प्रारंभी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील शिक्षिका यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक दिलीप इनामके,प्राचार्य प्रकाश चवरे,उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार,पर्यवेक्षक रितेश पांढरे तसेच सर्व महिला शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होत्या.मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेमध्ये बक्षीसे मिळवलेल्या स्पर्धकांना मेडल व सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या जयंतीनिमित्त प्रशालेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.इयत्ता ५ वी ते ७ वी वक्तृत्व स्पर्धा सिद्धी हेगडकर व गौरी कोळी -(प्रथम क्रमांक) विभागून,सृष्टी बनकर (द्वितीय), साईप्रिया यादव(तृतीय),इयत्ता ८ वी ते १० वी गट- संध्याराणी काळे(प्रथम),गौरी हुलगे (द्वितीय),मयुरी कुंभार(तृतीय), इयत्ता ११ वी १२ वी गटांमध्ये प्रांजली साळुंखे (प्रथम),नंदिनी गिद्दे (द्वितीय),सोफिया शेख (तृतीय),

मेहंदी स्पर्धा-इयत्त ५ वी ते ७ वी गट-वैभवी वाघमारे (प्रथम), सोनाक्षी चव्हाण(द्वितीय),श्रेया काटे(तृतीय),आकांक्षा कोळी (उत्तेजनार्थ),इयत्ता ८ वी ते १० वी गट दिव्या सरतापे (प्रथम), पायल जाधव(द्वितीय),अवंतिका बेंद्रे(तृतीय),समीक्षा खरात (उत्तेजनार्थ), इयत्ति ११ वी १२ वी गट मुली- प्रतीक्षा सरतापे (प्रथम),जान्हवी गायकवाड (द्वितीय),आयशा शेख(तृतीय), प्रज्ञा तूपसौंदर्य(उत्तेजनार्थ), मुले- निबंध स्पर्धा इयत्ता ११वी १२वी गट- भूमिका वाजाळे (प्रथम), माया चोरमले (द्वितीय),आयशा शेख(तृतीय),व मेहंदी मुले ज्ञानेश्वर जावीर (प्रथम),वेदांत पवार (द्वितीय),विराज रोकडे(तृतीय), साकीब काझी(उत्तेजनार्थ).स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींची तसेच रुद्र बनसोडे यांची भाषणे झाली प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष कोळी यांचे तर्फे सर्व विद्यार्थ्यांना जयंती निमित्त खाऊ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया होनमाने हिने केले तर आभार सुनील शिंदे यांनी मानले.कार्यक्रमासाठी मनीषा नलवडे,आशा रानमाळ यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज