कुर्डुवाडी शहरात म्हैसूर ते पंढरपूर(गोलगुंबज) एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी :-म्हैसूर ते सोलापूर असणारी गोलगुंबज एक्सप्रेसचा खासदार मा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सोलापूर ते पंढरपूर पर्यंत त्याचा विस्तार करण्यात आला असून आता ही गाडी म्हैसूर ते पंढरपूर अशी झाली आहे. ही गाडी आज कुर्डूवाडी स्टेशनवर आल्यानंतर त्याचे कुर्डूवाडी स्टेशनवर कुर्डुवाडी शहर महीला भाजपा पादधिकारी यांच्या शुभहस्ते गाडीचे पुजन करण्यात आले.तसेच नागरीकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सोलापूर ते पंढरपूर जाण्यासाठी प्रवाश्यासाठी तसेच वारकरी सांप्रदायातील भाविकांसाठी सकाळच्या सत्रात एक ही गाडी नसल्या कारणामुळे विविध प्रवासी संघटना तसेच भाविकांन कडून सातत्याने सकाळच्या सत्रात एका गाडीची मागणी होत होती. या गाडीची मागणी पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातुन अखेर म्हैसूर ते सोलापूर असणारी गोल गुंबज एक्सप्रेस पुढे सोलापूर ते पंढरपूर पर्यंत वाढवण्यात आली.यामुळे कुर्डुवाडी मधील प्रवाशांची ही सोय झालेली असून या वेळी सर्व नागरिकांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले.

या वेळी स्टेशन अधिक्षक लिला पंडीत,स्टेशन निरीक्षक भानवसे साहेब ऊपस्थीत होते.या एक्सप्रेस च्या स्वागत साठी
या वेळी भाजपा युवा मोर्चा माढा तालुका अध्यक्ष उमेश पाटील,सरचिटणीस सुधिर भाऊ गाडेकर,राजेंद्र वाल्मीकी,अतुल फरतडे,महिला शहरअध्यक्षा प्रतिक्षाताई गोफणे,शहर सरचिटणीस स्वातीताई गोरे,शहर उपध्यक्षा पदमावती ताई दातार,सौ रेश्मा जाधव ,शहरअध्यक्ष बालाजी गायकवाड,सुहास सरडे,अर्जुन रजपुत,सोमनाथ अलदर,महेश केदार,सनी शिंदे,वैभव जाधव आदी सह कुर्डुवाडी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज