गाव चलो अभियानास कुर्डूवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

कुर्डूवाडी प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टी माढा तालुका युवक अध्यक्ष ऊमेश पाटील यांच्या नेत्तुवाखाली प्रत्येक वाॅर्डात भाजपा पदाधिकारी जनतेत जाऊन या अभियानात सहभागी झाले.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा, त्यांच्यामध्ये मिसळण्याचा भाजपा पदाधिकारी यांनी प्रयत्न केला आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

यावेळी शहरातील भिंतीवर कमळाचे चिन्ह व फिर एक बार मोदी सरकार असे पेंटीग करण्यात आले.

नागरीकांना मोदी सरकारच्या योजनेचे पञक या वेळी देण्यात आले.

असा तर नागरीक व मतदारसंघातील नागरिकांशी माझा संवाद सुरूच असतो, परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांशी पुन्हा एकदा आपुलकीने संवाद साधता आला आणि आपल कुर्डुवाडी शहर जवळून अनुभवता आलं. हा अनुभव खरोखर मनाला समाधान देणारा होता. गावकरी बंधू-भगिनी, गावातील युवक-युवती, विद्यार्थी, अबालवृद्ध अशा सर्वांनीच या काळात दिलेलं प्रेम, आपुलकी नक्कीच अविस्मरणीय आहे. असे मत सर्वच भाजपा पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

यावेळी महीला तालुका अध्यक्षा प्रतिक्षाताई गोफणे,जिल्हा कार्यकारणी सदस्य सुधिर भाऊ गाडेकर,व्यापारी सेलचे तालुका अध्यक्ष निलेश सुराणा,भाजपा युवा मोर्चा तालुका ऊपाध्यक्ष सागर तरंगे,अनुसुचित मोर्चा शहरअध्यक्ष बालाजी गायकवाड,शार्दुल दातार,स्वातीताई गोरे,विद्याताई गोसावी,विजय देवकते,किरण शिंदे,अमित कारंजकर,शिरीष माने,लक्ष्मण कांबळे,दर्शन शर्मा,तात्या इंगोले,राकेश वाल्मीकी यांचेसह अनेक भाजपा पदाधिकारी व महीला,युवा पदाधिकारी ऊपस्थीत होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज