बेघर लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी सुधीरभाऊ गाडेकर यांचे कुर्डूवाडी नगरपालिकेसमोर समोर अमरण उपोषण

प्रतिनिधी : प्रधानमंञी आवास योजना शहरी कुर्डुवाडी शहरामधील बेघर लाभार्थी यांना लाभ मिळावा म्हणुन भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सुधिर भाऊ गाडेकर यांचे अमरण ऊपोषण.
प्रधानमंञी आवास योजनेतील बेघर लाभार्थी यांना जागा ऊलब्ध करुन त्यांना योजनेचा लाभ मिळावा म्हणुन अनेक वेळा निवेदन देऊन सुध्दा कुठलीच दखल न घेतल्यामुळे दिनांक: १२/०९/२०२३ मंगळवार सकाळी ११ वाजलेपासुन नगरपालिका कार्यालय कुर्डुवाडी येथे भाजपा युवा मोर्चा माढा तालुका सरचिटणीस सुधिर भाऊ गाडेकर यांनी पदाधिकारी,लाभार्थी यांचे ऊपस्थीत ऊपोषणाला सुरुवात केली.

ऊपोषण करते सुधिर भाऊ गाडेकर यांच्या मागण्या पुढील प्रमाणे
१) लाभार्थी यांना जागा खरेदीसाठी १ लाख अनुदान मिळावे.
२) नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करुन वर्षानुवर्ष राहणार्या लाभार्थी यांना ५०० चौ.फुट जागा नियमीत करुन त्या जागेवर घरकुल बांधणेस परवानगी देण्यात यावी.
३) स्वत:ची जागा नसल्यामुळे वर्षानुवर्ष कुर्डुवाडी हद्दीत राहणार्या बेघर लाभार्थी यांना नगरपालिका गावठाण हद्दीतील जागा घरकुल बांधण्यास परवानगी मिळावी.
४) शासनाची ६००रु ब्रास या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थी यांना ५ ब्रास वाळु मिळावी.
५) प्रधानमंञी आवास योजनेचे कामकाज बघण्यासाठी स्वतंञ इंजिनियर व कर्मचारी यांची योजना चालु असे पर्यंत नेमणुक करण्यात यावी.
६) ज्या लाभार्थी यांनी प्रधानमंञी आवास योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे घरावर प्रधानमंञी आवास योजनेचा बोर्ड लावणेत यावा.तसेच त्यांच्या असिसमेंट ऊतार्यावर प्रधानमंञी आवास योजनेची नोंद करावी.
७) AHP योजना कुर्डुवाडी शहरात राबवण्यात यावी.
या वेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष ऊमेश पाटील,भाजपा मा.शहरअध्यक्ष विजयसिंह परबत,कुर्डुवाडीचे मा.नगरअध्यक्ष सुर्यकांत दादा गोरे,मा.नगरसेवक गणेश गोरे,भाजपा महीला नगरअध्यक्षा प्रतिक्षाताई गोफणे,संतोष क्षिरसागर,सागर तरंगे,गणेश समदाडे,बाळासाहेब शेंडगे,युवराज हिवाळे,लक्ष्मण कांबळे,नितीन कुंभार,प्रदीप नाना कोकाटे,वैजिनाथ राऊत यांचे सह अनेक नागरीकांनी या वेळी अंदोलनाला पाठींबा दिला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज